अवकाळी पावसामुळे समोर आला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे हलगर्जीपणा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ८ मार्च २०२२ | जळगाव येथे ढगाळ वातावरण वातावरणामुळे ७ मार्च रोजी रात्री पासून किरकोळ पाऊस झाला. यामुळे यावल शहरातील तिरुपती नगर, फालकनगर, आयेशा नगर , काजी नगर , एसटी स्टँड परिसर व इतर काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

मंगळवारीही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पाऊसही झाला. यावल , चोपडा रोडवर वढोदे गावाच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर सकाळी जवळ 8 मार्च रोजी सकाळी नदीवरील पुलावर पावसाचे पाणी साचले होते. पाणी वाहून जात नसल्याने वाहतूकदारांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.

अधिकाऱ्यांचे नियत्रण राहिले नसल्याचा नागरिकांनी आरोप केला. अवकाळी किरकोळ पावसामुळे वीजपुरवठा खंडित होतो. पावसाचे पाणी पुलावर साचुन असल्यामुळे तसेच कामांमध्ये टक्केवारीचे प्रमाण वाढल्याने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची निष्क्रियता उघड झाली आहे.

अधिकारी कर्मचारी व ठेकेदार लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकाऱ्यांचे नियत्रण राहिले नसल्याचा आरोप सुद्धा नागरिकामधून होत आहे. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर या अवकाळी पावसाने अनेक प्रश्न निर्माण केले. पण यावरूनच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे काम आणि हलगर्जीपणा दिसून आला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like