जळगाव तालुक्यात २ म्हशींची चोरी ; गुन्हा दाखल
खान्देश लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । जळगाव तालुक्यातील खिर्डी गावातून ९० हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, संतोष शांताराम कोळी (वय-३९) रा. खिर्डी ता.जि.जळगाव हे शेतकरी असून आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्या घराच्या मागे असलेल्या गोठ्यात त्यांच्या मालकीच्या म्हशी बांधलेल्या असतात. ४ जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांनी दोन्ही म्हशींना चारापाणी करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ९० हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी चोरून नेल्याचे गुरूवार ५ जानेवारी रोजी सकाळी ४ वाजता निदर्शनास आले. त्यांनी दोनही म्हशींचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. दुपारी १२ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधीर विसपूते करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम