अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिघांनी केला विनयभंग
खान्देश लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । तालुक्यातील एका गावात अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिघांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या संदर्भात अधिक असे की, दि. ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिडीता बसस्टॅड जवळील वडिलांच्या दुकानावर असतांना भूषण नामदेव पाटील, जीवन प्रभाकर चव्हाण, चेतन रवींद्र पाटील (तिघं रा. कजगाव) या तिघांनी दुकानावर येत पिडीत मुलीशी अश्लिल संवाद साधत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध पिडीत विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम