आरपीएफ जवानावर चाकूने हल्ला ; एकाला अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । केबल वायर चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना हटकले असता त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरपीएफ जवानावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना दुसखेडा रेल्वेस्थानकाजवळ घडली . यावेळी आरपीएफ जवानाने एकाला पडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ४ जानेवारी रोजी रात्री ११ : ३० वाजेच्या सुमारास आरपीएफवर जवान अनुजकुमार रीसिपालसिंग हे नेहमी प्रमाणे दुसखेडा रेल्वे स्टेशनवर गस्त घालत होते. यावेळी त्यांना दोन अज्ञात चोरटे संगनमताने रेल्वे स्टेशन जवळ असलेले इले. रेल्वे केबल वायर चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतांना दिसून आले. आरपीएफवर अनुजकुमार यांनी दोघांना हटकताच चोरट्यांनी पळ काढला.

अनुजकुमार यांनी दोघांचा रात्रीच्या अंधारात सिनेस्टाईल पाठलाग सुरु केला. यातील चोरटे त्यांना दुसखेडा रेल्वेस्टेशन बाहेरील कपाशीचे शेतात गेल्याचे दिसले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी एकाने अनुजकुमार यांच्या डावे दंडावर चाकु मारून जबर दुखापत केली. एका चोरट्याला पकडण्यात यश आल्यावर त्याची ओळख त्याने रवींद्र भाऊलाल सोनवणे (वय ३७, रा. उटखेडा, यावल) अशी सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून रवींद्र सोनावणेला अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like