विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या चहावाल्याला अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । यावल बस्थानकात चहा विक्रेत्याने कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

तालुक्यातील एका गावातून पीडित विद्यार्थिनी यावल येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी येते. बस स्थानकावरून महाविद्यालयात जाताना या अल्पवयीन मुलीचा यावल येथील बस स्थानकावरील चहा विक्रेता अशोक नानकराम दुधानी (वय ४०, रा. भुसावळ) हा गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करत होता. गुरूवारी पीडिता एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याकडे मोबाइल नंबरची मागणी व विनयभंग केला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांना तात्काळ दुधानी यास ताब्यात घेतले. त्याच्या विरूद्ध पोस्कोचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like