भरधाव रुग्णवाहिकेने धडक दिल्याने महिला जागीच ठार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेची धडक एका महिलेस बसल्याने त्या जागीच ठार झाल्याची घटना आज ६ रोजी सकाळी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. संगीता कैलास पाटील (वय ४८) असे मयत महिलेचे नाव आहे.

संगीता पाटील यांचे पती कैलास पाटील हे आजारी असल्याने त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे संगीताबाई पाटील या आज शुक्रवार ६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता सासू इंदुबाई यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाण्याकरिता निघाल्या होत्या. कुसुंबा गावातून येत असताना भरधाव वेगाने येणार्‍या रुग्णवाहिका क्रमांक (एमएच १९ सीवाय ७०९१) ने जोरदार धडक दिली.

या धडकेत संगीताबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच ठार झाल्या. ही घटना घडल्यानंतरच त्याच रुग्णवाहिकेतून संगीताबाई पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like