जामनेर ,रावेर येथे महिलांचा विनयभं ; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । जामनेर आणि रावेर तालुक्यात दोन महिलांचा विनय भंग केल्याच्या घटना घडल्या असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात महिला झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास झोपलेली असताना राम चव्हाण याने अश्लिल संभाषण केले. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रशांत गिरणारे हे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत रावेर तालुक्यातील एका गावात घडली आहे. ३० वर्षीय महिला घरात झोपलेली असतांना मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास कैलास सुरेश अटकाळे याने दरवाजा वाजवला. पिडीत महिलेने दरवाजा उघडताच कैलास घरात शिरला आणि त्याने महिलेसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पिडीत महिलेने पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. नितीन डाबरे हे करीत आहेदरम्यान आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like