रशियातील युद्धजन्य परिस्थितीतून मायदेशात सुखरूप परतला अनिकेत गायकवाड
खान्देश लाईव्ह | ८ मार्च २०२२ | सर्वांनाच माहित आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेन आणि रशिया मधील युद्ध जोरदार पद्धतीने चालू आहे परंतु तेथे अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. जळगाव शहरात मुक्ताईनगर येथील जे.ई.स्कुल’चे शिक्षक तथा सुकळी येथील समाधान गायकवाड यांचा मुलगा रशिया येथुन खडतर प्रवास करुन ८ मार्च रोजी सुखरुपपणे घरी परतला आहे. त्यांच्या मित्रांनी त्याचे अनोख्या पध्दतीने स्वागत केले.
तालुक्यातील सुकळी येथील समाधान गायकवाड यांचा मुलगा अनिकेत गायकवाड वैद्यकीय शिक्षणासाठी रशिया येथील सिम्फोरोपोल या शहरात राहत होता. युध्दाला झाल्यानंतर विद्यापीठ बंद करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना घरी परतण्यास सुचना देण्यात आल्या. दरम्यान अनिकेत सह भारतीय चार विद्यार्थी होते. युध्दसीमा जवळच असल्याने तेथील नागरीक व विद्यार्थी यांच्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तसेच बाॅम्बहल्ल्याची भीती होती.
अनिकेत ने पुढे सांगितले की, या भारतीय पाच विद्यार्थांच्या गृपने सिम्फोरोपोल ते माॅस्को असा सुमारे २००० हजार कि.मी.चा रेल्वेने तब्बल ३४ तास प्रवास करत माॅस्को शहर गाठले. दरम्यान माॅस्कोमध्ये वाहतुक सेवा ठप्प असल्याने चार दिवस एकाच जागी काढावे लागले. कोणत्याही हाॅटेलात आम्हाला घेतले जात नव्हते. याठिकाणी कुणीही आम्हाला कोणत्याच प्रकारची मदत केली नाही.
एकत्र प्रचंड थंडी आणि दोन दिवस, रात्र आम्ही विमानतळावर कशीबशी घालवली. नंतर वडीलांच्या मित्राच्या मध्यस्थीने एका हाॅटेलात राहण्याची सोय झाली. तेथे आम्ही चार दिवस थांबलो वाहतुक सुरळीत झाल्यानंतर दि ६ मार्च रोजी माॅस्को ते दिल्ली विमानाने प्रवास करुन, दि ७ मार्च रोजी दिल्ली ते मलकापुर रेल्वेने प्रवास करीत घरी सुखरुप परतलो.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम