जळगावात अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
खान्देश लाईव्ह | ८ मार्च २०२२ | सोमवारी राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात देखील सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह, गारपिटी पावस कोसळला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याचं दिसून आले. ज्वारी, हरबरा आणि गहू काढणीच्या तोंडावर अवकाळी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांन पुढे पुन्हा एकदा संकट निर्माण झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला आहे. या गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. डोळ्यांसमोर पिकं उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी हताश झाले आहेत.तसेच मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपिटीची होण्याची देखील शक्यता आहे. यावेळी हवेचा वेग वाढणार असून ताशी 40 कि.मी वेगाने वार वाहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण व ऊन सावलीचा खेळ चालू होता. जळगाव जिल्ह्यात धरणगाव, पाचोरा, भुसावळ तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गहू, हरभरा, दादर, बाजरी पिकाचे नुकसान होईल. आज सकाळपासून पुन्हा या परिसरात अवकाळी पाऊस बरसतोय. . या पावसामुळे उन्हाळी कांदा, गहू ,हरभरा पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.तसेच वादळी वाऱ्याने कापून ठेवलेला हरभरा देखील उडून गेल्याने शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे.हवामान विभागाकडून ७ ते ११ मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवल्याने आधीच तणावात असलेला शेतकरी या पावसामुळे अधिकच धास्तावला.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम