विधानसभेत गिरीश महाजन यांची शेलार यांनी केली झोपमोड

खान्देश लाईव्ह | ८ मार्च २०२२ | सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून काल विविध मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस मोठ्या जोशाने भाषण करत होते. महाविकास आघाडीवर टीका करत असतानाच त्याचवेळी त्यांच्या मागे बसलेले भाजपाचे नेते गिरीश महाजन झोपेत पेंगत असल्याचे दिसून आले आहे.
देवेंद्र फडणवीस काय बोलतात, ते ऐकून तरी घ्या, अशा गिरीश महाजन यांचा एकूण आविर्भाव होता. डुलकीतून सावरल्यानंतर जणू काही झालेच नाही, असे गिरीश महाजन यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट त्यांच्या शेजारीच बसलेल्या भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या लक्षात आली. तेव्हा आशिष शेलार यांनी बसल्या जागेवरून हळूच गिरीश महाजन यांना धक्का मारला.
विशेष म्हणजे झोप मोड होताच महाजन यांनी थेट हात वर करत गोळीबार गोळीबार करत फडणवीसांच्या भाषणातील मुद्दा पुढे रेटला. हा प्रसंग नेमका कॅमेऱ्यात टिपला गेला. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या व्हीडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मुद्दावर आणि ओबीसी आरक्षणावरून विरोधक पहिल्या दिवसापासून आक्रमक आहेत. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्लाबोल करताना दिसतात.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम