ब्रह्माकुमारीजचे कार्य विश्वशांती आणि मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीचे – महामंडलेश्वर प.पू.श्री बालयोगी महाराज
खान्देश लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे कार्य हे शांती, सद्भावनेचे असून मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीचे असल्याचे प्रतिपादन श्रीश्री1008 महामंडलेश्वर प.पू.श्री बालयोगी महाराज यांनी अकुलखेडा येथे चैतन्य दुर्गाच्या सजीव आरासचे उद्घाटन करतांना केले.
अकुलखेडा परिसरात श्रीश्री1008 महामंडलेश्वर प.पू.श्री बालयोगी महाराज प्रणीत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी ब्रह्माकुमारीज् चोपडातर्फे परिसरात शक्तिचे प्रतीक नवदुर्गा सजीव आरास साकारण्यात आली आहे. उदघाटन प्रसंगी प.पू.श्री. बालयोगी महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मी ज्या-ज्या ठिकाणी जातो तेथे श्वेत वस्त्रधारीणी ब्रह्माकुमारी बहिणी भेटतात. आम्ही परमात्म्याचे विचार भाविकांपर्यंत पोहचवितो तसेच कार्य ब्रह्माकुमारीज बहिणी करीत असून आध्यात्मिक विचारधारेतील हे साम्य जगातील सर्व आध्यात्मिक शक्तिंना एकत्र आणते.
ब्रह्माकुमारीज्तर्फे परिसरात 40 फुटी नवदुर्गा आरास उभारण्यात आली असून याचे प्रमुख वैषिष्ट्य म्हणजे ध्वनी आणि प्रकाशचे सुंदर मिश्रणातून प्रत्येक देवीच्या आध्यात्मिक रहस्याचे स्पष्टीकरण आणि मातेच्या शक्तिची महिमा यांचे दर्शन याप्रसंगी होते. याबरोबरच भारतमाता दर्शनातून भारताच्या विविधतेचे दर्शन होते. याबरोबर आध्यात्मिक रहस्यस्पष्ट करणारे चित्र प्रदर्शनही लावण्यात आलेले आहे. उदघाटन प्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथींनी विश्वशांतीच्या या कार्यास शुभेचछा दिल्यात. आरास उदघाटन आदरणीय परमपूज्य श्रीश्री1008 महामंडलेश्वर प.पू.श्री बालयोगी महाराज, ब्रह्माकुमारी राजयोगीनी मिनाक्षीदीदीजी, उपक्षेत्रीय निर्देशिका, जळगाव, ब्रह्माकुमारी मंगलादीदी, चोपडा सेवाकेंद्र संचालिका, प्रकल्प प्रमुख ब्रह्माकुमार मुखर्जी माजी विधान सभा सदस्य तथा आमदार अरुणभाई गुजराथीजी, माजी आमदार कैलासबापू पाटील, चंद्रहास गुजराथी, अध्यक्ष, चोपडा पिपल्स बँक, चोपडा, पंकजदादा बोराले, अध्यक्ष, पंकज शैक्षणिक संस्था, घन:श्याम पाटील, माजी अध्यक्ष चोपडा साखर कारखाना, अमृतराज सचदेव, अध्यक्ष व्यापारी मंडळ, चंदूमामा पालीवाल, माजी नगरसेवक, विश्वनाथजी अग्रवाल, प्रकाश राजपूत आदिंच्या शुभहस्ते झाले.
कार्यक्रमाचे संचलन ब्र.कु. राजबहन यांनी केले तर हर्षाली आणि शौर्य, आर्या, गायत्री यांनी आध्यात्मिक गीतावरील नृत्यांने सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण शहादा येथील बी.के. राम यांनी 7 देशात केले. दि. 31 डिसेंबर पर्यंत सदरहू आयोजन असुन सर्व नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम