तरुणाच्या खुनाने जळगाव हादरले
खान्देश लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I दोन दिवसांपासून बेपत्ता असणार्या तरूणाचा मृतदेह आज आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी ( वय ३३, रा. मेहरूण ) हा तरूण विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. तो शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाला होता. आज दुपारी त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत गिरणा नदीच्या जवळ असलेल्या महादेव मंदिराच्या खालील बाजूस आढळून आला. प्रथमदर्शनीच त्याचा खून करून मृतदेह फेकून दिल्याचे दिसून येत आहे.
याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान, मयत प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम