शेंदुर्णी येथे तरुणावर विळ्याने वार ; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर लोखंडी विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे घडली आहे. याबाबत रविवार ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर सुभाष ढगे (वय-२८) रा. वाडी दरवाजा शेंदुर्णी ता. जामनेर हा तरुण राहतो . गावात राहणारे समाधान बळीराम पाटील आणि संदीप रामदास काटोले यांनी जुन्या भांडणाची पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणावरून सागर याला शनिवारी १० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता गावातील पाण्याच्या टाकीजवळ पकडून समाधान पाटील व संदीप काटोले या दोघांनी लोखंडी विळ्याने मानेवर वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत सागरला जामनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले आहे.सागर ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी समाधान बळीराम पाटील आणि संदीप रामदास काटोले दोन्ही रा. वाडी दरवाजा शेंदुर्णी दोघांविरुद्ध रविवारी ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील समाधान पाटील याला पोलिसांनी अटक केली आहेत तर दुसरा फरार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like