अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; पारोळा तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I पारोळा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहतात . १० डिसेंबर रोजी रात्री साडेदहा ते ११ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील राहुल छोटू अहिरे (वय 22) या तरुणाने अल्पवयीन मुलीला काहीतरी फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु अल्पवयीन मुलगी कुठेही मिळून आली नाही. यासंदर्भात रविवारी ११ डिसेंबर रोजी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून संशयित आरोपी राहुल छोटू अहिरे (वय-२२) रा. नगरदेवळा ता. पाचोरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल शेख करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like