माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I कथित १०० कोटी रूपयांच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला असून सीबीआयने या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी वेळ मागितला आहे.

२ नोव्हेंबर २०२१ रोजी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना कथित १०० कोटी रूपयांच्या वसुली प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांचा जामीन अर्ज अनेकदा नामंजूर करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच ईडीच्या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला होता, तर सीबीआयवरील सुनावणी बाकी होती. ही सुनावणी पूर्ण होऊन आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. यामुळे ते कारागृहाच्या बाहेर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जवळपास १३ महिन्यांपासून अनिल देशमुख कारागृहात होते. त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसून फक्त सचिन वाझे यांच्या जबाबावरूनच त्यांना अटक करण्यात आली असल्याचा मुद्दा देशमुख यांच्यातर्फे न्यायालयात सादर करण्यात आला होता. याला मान्य करत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र सीबीआयने याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. यावर कोर्टाने दहा दिवस इतका वेळ दिला आहे. यामुळे देशमुख यांना जामीन मिळाला असला तरी ते लागलीच बाहेर येणार नसून सुप्रीम कोर्टात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like