कुर्‍हेपानाचे येथे घरफोडी ; ११ हजारांचा मुद्देमाल लंपास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत हॉटेल मालकाच्या घरातून 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरती स्वानंद बडगुजर (38, अंबिकानगर,कुर्‍हे) या हॉटेल व्यावसायीक असून कामानिमित्त त्या बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी साडेआठ हजारांची रोकड, तीन हजार रुपये किंमतीचे दोन मनगटी घड्याळ मिळून एकूण 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला.

बडगुजर या बाहेरगावाहून आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भुसावळ तालुका पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास नाईक गणेश गव्हाळे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like