ग्रामसभाच सुप्रिम पॉवर – देवाजी तोफा

बातमी शेअर करा

 

खान्देश लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ I ‘महात्मा गांधीजी यांच्या ‘ग्रामस्वराज्य’ या संकल्पनेवर आम्ही काम करत गेलो गावाच्या समस्या गावातच सोडविल्या आहेत. ग्रामसभेत सर्व सहमतीने स्वराज्यच्या दिशेने प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश याप्रमाणे लोकसभा, विधानसभा आणि ग्रामसभा होय यातील ग्रामसभा हीच सुप्रिम पॉवर आहे; यात महात्मा गांधी व विनोबा भावे यांची गामस्वराज्याच्यादृष्टीने सत्ताविकेंद्रीकरण ही संकल्पना दिसते ‘ असे महत्त्वपूर्ण विचार देवाजी तोफा व्यक्त केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यानमालेमध्ये ‘सर्व सहमति से ग्राम स्वराज की ओर’ याविषयावर देवाजी तोफा ह्यांनी दुसरे पुष्प गुंफले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, संचालक अशोक जैन यांनी ऑनलाईन उपस्थिती दिली. त्यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला. देवाजी तोफा, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचा सुतीहार देऊन सत्कार उदय महाजन, नितीन चोपडा यांनी केला. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने महात्मा गांधीजींची प्रतिमा, खादीवस्त्र देऊन देवाजी तोफा यांचा सन्मान करण्यात आला. व्याख्याच्या सुरवातीला देवाजी तोफा, डॉ. सुदर्शन अय्यंगार यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. गांधीतीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिरास उपस्थित युवक-युवतींनी ‘गाव छोडत नही…जंगल छोडतं नही’ हे आदीवासींचे गाणे म्हटले. सूत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी केले. आभार डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी मानले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्याख्यानमालेची भूमिका स्पष्ट केली. त्यात गांधी रिसर्च फाऊंडेशचे संस्थापक अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी हे गांधी विचारानुसार जीवन जगले त्यांनी सुरू केलेली परंपरा गांधी रिसर्च फाऊंडेशन कार्य करीत असल्याचे डॉ. अनिल काकोडकर म्हणाले. संचालक अशोक जैन यांनी महात्मा गांधीजींचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी देवाजी तोफा सारखे कार्य वाढले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा गावाचा रोचक परिवर्तनाची प्रेरक कहाणी देवाजी तोफा यांनी मांडली त्यात ते म्हणाले की, पृथ्वीवरील मानव मंगळावर पोहोचला परंतु तो दुर्दैवाने माणसापर्यंत पोहोचू शकला नाही. विज्ञानाला दिशा नसते ती दिशा अध्यात्मातून मिळते. अध्यात्म म्हणजे आत्मा व शरीर हे विज्ञान आहे. जल, जंगल, जमीन आणि निसर्गापासून मानवाने शिकायला हवे असे महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करत देवाजी तोफा यांनी विषयाची मांडणी केली.

महिला सक्षमीकरणाशिवाय गावाचा विकास होणार नाही यासाठी गावात मातशक्तीला मानले पाहिजे. कुणी दारू पिऊन महिलेला मारहाण करत असेल तर महिलांना जाऊन त्याला समजावीले पाहिजे यातून ति एकटी नाही हा संदेश जातो.

गावाच्या स्वावलंबनासाठी संसाधनांचा वापर, गावाच्या सर्व सहमतीतून विकास प्रक्रियेच्या निर्णयात प्रत्यक्ष सहभाग यासाठी ग्रामसभा महत्त्वाची मानली जाते. विशेष ग्रामसभेत प्रत्येकाने उपस्थित असणे अनिवार्य आहे. जर कुणी गैरहजर राहत असेल तर त्याचे कारण द्यावे लागते. ग्रामसभेत सर्व स्त्री-पुरुषांना आपापले मत मांडण्याचा समान अधिकार आहे. गावाच्या निर्णय घेण्यासाठी ग्रामसभा, अभ्यास करण्यासाठी अभ्यास मंडळ अशा दोन स्वतंत्र रचना आहेत. अभ्यास मंडळात फक्त चर्चा करायची, निर्णय घ्यायचा नाही असेही ठरलेले आहे. सरकारची योजना गावात राबविली जात नाही. कायदा कानून बनविले जातात पण त्यांचा फायदा किती मिळतो? ह्यावर अभ्यासपूर्ण अध्ययन, विचार करण्याची गरज असल्याचे मत देवाजी तोफा यांनी व्यक्त केले. ‘दिल्ली, मुंबई हमारी सरकार, हमारे गाव में हम ही सरकार’ असा नारा देण्याची गरज आहे. यातून महात्मा गांधीजींनी दिलेल्या विचारांना आत्मसात करून त्या मार्गावर चालणे म्हणजे खऱ्या अर्थाने माणूस होणे होय असेही त्यांनी सांगितले.

ग्रामदान कायदा -1964 हे समजून सांगितले त्यासाठी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादाबाबतचे अनुभूव त्यांनी सांगितले. जमीन वाढत नाही तर लोकसंख्या वाढत चालली आहे. त्या सर्वांच्या गरजा पाहता अनेक समस्या निर्माण होतात. मात्र जेवढे विरोध प्रश्न निर्माण करून होत नाही तेवढी ती चर्चा करून सहज सोडविता येते यासाठी सकारात्मकता महत्त्वाची आहे. सर्व सहमती कुठेच होणार नाही मात्र एक विचाराने, अभ्यासू पणाने विचार करून सामूहिक व लोकशाही पद्धतीने निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. महात्मा गांधीजींना सांगितलेला अहिंसेचा मार्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी दिलेल्या संविधानिक स्वातंत्र्यातून मी पणा सोडून आम्ही सर्व या भावनेतून प्रत्येकाने आचरण केले पाहिजे यातूनच गावाचा विकास आणि प्रगती होऊ शकते परिणामी देश बलशाली होऊ शकते असे महत्त्वपूर्ण विधान देवाजी तोफा यांनी केले.

दरम्यान, हे सर्व होत असतांना आज जळगावचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत या संदर्भात प्रश्‍न उपस्थित करून मधुकर साखर कारखान्याच्या निविदा प्रक्रियेचा मुद्दा उपस्थित केला. शेतकरी आणि कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणात देणी बाकी असतांना फक्त १५ कोटी रूपये घेऊन खासगी मालकाच्या ताब्यात हा कारखाना कसा दिला ? असा प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर सहकार मंत्र्यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like