जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यांचे ऑलिम्पियाड स्पर्धेत यश

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ I शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यानी इंटरनॅशनल जनरल नॉलेज, इंटरनॅशनल सोशल स्टडीज आणि इंटरनॅशनल मॅथेमेटिक्स ऑलिम्पियाड स्पर्धेत उत्तम गुणांसह यश प्राप्त केले.

 

स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवल्याने स्कूलच्या प्राचार्या तेजल ओझा यांच्या हस्ते विध्यार्थ्यांचा गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड स्पर्धेत मनस्वी शिरसाठ, विधी गाला, विराट साहित्या, विरांश सुराणा, युग पंगारिया, विग्नेश कड्गड, आलीया तडवी यांना झोनल गोल्ड मेडल तर स्वरा वाघ, ईशान भंडारी, क्षितिज मोरे, बटूल मास्टर, सामर्थ्य नेमाने, जैनील गाला, राधिका चव्हाण, उदय बोरसे, शिनी जोशी यांना गोल्ड मेडल एक्सलन्स तसेच स्वरा कासट, अंशिका डांबले, द्रिष्टी जैन, अरेण माधवानी, विधी सावणा, अदय मोहपात्रा या विध्यार्थ्यांना मेडल ऑफ डिस्टीक्शन हे पदक मिळाले आहे

 

तसेच एसओएफ इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड स्पर्धेत अर्ना पाटील, द्रिष्टी जैन, गुरुदीप जंगले, नव्या साहित्या, अंशिका दामले, क्षिप्रा महाशब्दे, लावण्या पाटील, सामान्यु जैन उजेशा चौधरी, भक्ती खडके, काव्यश्री चंद्रवंशी, रोनक भाला, रुद्रा मतानी, क्रीतांश सुराना, लव्ह हसवाणी, खुश हसवाणी, समजमकौर छाबडा, विहान मुथा, इवान जैन, पलक कोठारी, श्राव्या मुथा, युगांत दप्तारी, विधी सावणा, प्रग्याप्ती मेहता, रोहित निकम, कौस्तुभ साळुंखे यांनी यश मिळवले. याप्रसंगी स्पर्धेत विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले तर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींसह पालक व स्कूल कमिटी सदस्य यांचे या सर्व विध्यार्थ्यांना मागदर्शन लाभले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like