डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाचे मुखकर्करोग जनजागृती अभियान

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ I तोंडातील छाला हा कर्करोगाचा तर नाही ना? नववर्षानिमीत्‍त डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाने आता मुखकर्करोगावर जनजागृतीसाठी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि १ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत याबाबत तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे.

 

मौखिक कर्करोग (जीरश्र उरपलशी) हा कार्सीनोमा(उरीलळपेार) प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू, किंवा गालांच्या आतील बाजूस होतो. बर्‍याचदा तो गाल आणि हिरड्यांमध्ये(र्ॠीाी) दिसून येतो. जेव्हा शरीरातील अनुवांशिक बदलामुळे पेशी नियंत्रणशिवाय जास्त वाढतात तेव्हा हा कर्करोग होतो. या पेशी जसजशा वाढतात तसतसे ते एक ट्यूमर तयार करतात. कालांतराने या पेशी शरीराच्या इतर भागातही पसरतात.
याचे नेमके लक्षण माहिती नसल्याने टाळाटाळ होवू नये तसेच वेळीच उपचार व्हावे या उददेशाने या अभियानात तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे. याचबरोबर तपासणी नंतर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा देखिल उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांनो वेळीच उपचार केल्यास तोंडाचा कर्करोग(र्चेीींह उरपलशी) पूर्ण बरा होऊ शकतो. वयाच्या ४० नंतर हा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. आनुवंशिकतेमुळेही तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. तोंडाच्या कर्करोगाचा(र्चेीींह उरपलशी) उपचार हा कोणत्या स्टेजमध्ये कॅन्सर आहे यावर अवलंबून असतो. गाठीचे स्वरूप, कॅन्सर किती पसरलेला आहे याप्रमाणे उपचार पद्धती ठरते. सर्जरी, केमोथेरपीद्वारे या कर्करोगावर उपचार केला जातो. कॅन्सर जर पहिल्या किंवा दुसर्‍या स्टेज मध्ये असेल तर शस्त्रक्रिया करून कॅन्सर काढून टाकला जातो. मानेमध्ये गाठी असतील तर त्याही काढून टाकल्या जातात. यामध्ये रुग्णांच्या जीभ, जबडे, गाल या अवयवांची झालेली हानी आधुनिक पद्धतीने प्लास्टिक सर्जनच्या मदतीने इतर अवयवांचा वापर करून भरून काढली जाते. तिसर्‍या स्टेजमधील कॅन्सर साठी ऑपेरेशन नंतर रेडीएशन ची गरज भासते. रेडीएशन च्या माध्यमातून आजार परत येण्याची शक्यता कमी करता येते. कॅन्सर च्या चौथ्या स्टेज मध्ये केमोथेरपीचा उपचार केला जातो. या स्टेज मध्ये मात्र रुग्णाचे आयुष्य कसे वाढवता येईल याचाच विचार करावा लागतो. काही गोष्टींची काळजी घेतली तर हा कर्करोग टाळता येऊ शकतो, जसे की धूम्रपान व मद्यपान न करणे, दात आणि तोंड नियमितपणे स्वच्छ करणे. तोंडामध्ये काही बदल दिसला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते नावनोंदणी व अधिक माहितीसाठी निवासी डॉ.श्रृती खंडागळे ८२०८९०९४५६ व डॉ. हर्षल महाजन यांचेशी ९९२०८५५३५३ या नंबरवर संपर्क करावा. या अभियानात तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉ. उल्हास पाटील रूग्णलयातर्फे करण्यात आले आहे.

केसपेपर, डॉक्टरांकडून तपासणी, निदान, उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मोफत
आजार असो अथवा नसो तरी काही लक्षणे जाणवल्यास वेळीच तपासणी करुन घेणे गरजेचे असते. नागरिकांच्या हितास्तव डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने मुखकर्करोग जनजागृती अभियानाचे आयोजन केले आहे. कर्करोग हा जितका लवकर समजून येतो तितके लवकर उपचार झाल्यास रुग्णावरील धोका टळतो. रुग्णालयात सोबत येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे, रुग्णालयात आल्यावर रुग्णांना केसपेपरसहीत डॉक्टरांकडून तपासणी व सल्‍ला मोफत दिला जात आहे. तसेच रुग्णाचे लक्षणे कर्करोगाची आढळल्यास दाखल करुन घेत महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत आवश्यक तपासण्या, शस्त्रक्रिया व उपचारही येथे केले जात आहे. इंग्रजी नविन वर्षात आपण निरोगी आरोग्याचा संकल्प केला असल्यास किंवा काही त्रास असल्यास आवर्जुन मुखकर्करोग जनजागृती अभियानात सहभागी व्हावे. रुग्णालयात डॉ. अनुश्री अग्रवाल,डॉ. विक्रांत वझे हे काही कर्करोग तज्ञांपैकी एक आहेत ज्यांच्याकडे नाक कान घसा एम एस ही मान्यताप्राप्त पदवी आहे. ते या अभियानात तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत तसेच डॉ.श्रृती खंडागळे, डॉ. हर्षल महाजन, डॉ. चारू सोनवणे, डॉ. रितू रावल ह्या निवासी वैद्यकिय अधिकार्‍यांची टीम त्यांना सहकार्य करणार आहेत.

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like