शेंदुर्णी येथे अवैध वाळूने भरलेला ट्रक पकडला

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक पहुर पोलिसांनी पकडला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात सोमवारी २६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील देवीच्या मंदिराजवळून सोमवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी ६.१५ वाजता बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक ट्रक मधून होत असल्याची गोपनीय माहिती पहूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत ट्रक क्रमांक (एमएच १९ सीटी ५८४८) याच्यावर कारवाई करत वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विजयकुमार विश्वास पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक संजय परदेशी रा. पुनगाव ता.पाचोरा यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ प्रशांत वीरनारे करीत आहे.

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like