स्पाईन शिबिराचा १२५ रुग्णांनी घेतला लाभ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I अलीकडे रस्त्याच्या समस्येमुळे अनेक दुचाकीधारकांना तसेच वर्षानुवर्षे जड काम करणार्‍याना सर्वच महिलांसह पुरुषांना स्पाईन अर्थात मणक्यांचे विकार मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहे. उपचारासाठी हॉस्पीटलला गेले असता हजाराहून अधिक रुपयांचा खर्च विविध तपासण्या तसेच डॉक्टरांचा सल्‍ला घेण्यासाठी लागतो. ही बाब लक्षात घेता गरजू रुग्णांसह सर्वांसाठीच डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे स्पाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आतापर्यंत १२५ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. हे शिबिर शनिवार, ३१ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात अस्थिरोग विभागातील अस्थिरोग तज्ञ डॉ.दिपक अग्रवाल, डॉ.प्रमोद सारकेलवाड, निवासी डॉ.सुनीत वेलणकर, डॉ.राहूल जनबंधू, डॉ.परिक्षीत पाटील, डॉ.पियुष पवार, डॉ.चाणक्य, डॉ.प्रसाद बांबरसे अशी मोठी टिम रुग्णांच्या सेवेत सज्ज आहे. अस्थिरोग विभागातर्फे नुकतेच स्पाईन शिबीर आयोजित केले असून याअंतर्गत मणक्यासंदर्भातील सर्वच समस्यांवर तज्ञांद्वारे मोफत उपचार केले जात आहे. रुग्णांनी सोबत येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे, महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत उपचार केले जात आहे.
मणक्याच्या आजाराचे निदान होण्यासाठी शिबिरांतर्गत केवळ २ हजार रुपयात मणक्याचा एमआरआय केला जातो. दररोज दहा ते पंधरा रुग्ण उपचारार्थ दाखल होत असून शिबिराचा रुग्णांना लाभ दिला जात आहे. अधिक माहितीसाठी निवासी डॉ. पियुष पवार ९६२३०४३६२३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत १२५ रुग्णांची तपासणी
स्पाईन शिबिरांतर्गत अस्थिरोग तज्ञांकडून आतापर्यंत १२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यांना उपचारविषयक योग्य तो सल्‍ला आणि मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच काहींना शस्त्रक्रिया गरजेची असून त्यातबाबतही तज्ञ डॉक्टरांनी सल्‍ला दिला आहे. हे शिबिर सकाळी १० ते ५ या वेळेत सुरु असून दिनांक ३१ डिसेंबरपर्यंत गरजू रुग्णांना शिबिराचा लाभ घेता येणार आहे.

मान, पाठ, कंबर यांचे दुखणे हे सुरुवातीच्या काळात साधे वाटत असले तरी ते पुढच्या दृष्टीने गंभीर स्वरुपाचे असते. मान, पाठ, कंबरदुखीची कारणे वेगवेगळी असू शकतात. ठराविक वयोमानात किंवा वयाच्या आधीही हे आजार बळावू शकतात त्यामुळे त्याकडे कुणीही दुर्लक्ष करु नये. सततची मान, पाठ, कंबरदुखी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक त्या तपासण्या करुन उपचार करुन घेतल्यास भविष्यातील धोके टाळता येतात.
– डॉ.दिपक अग्रवाल, विभागप्रमुख, अस्थिरोग विभाग

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like