डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात फ्रेशर्स वेलकम पार्टी उत्साहात

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी एलएल.बी., बी. ए. एलएल. बी. आणि एलएलएम या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी नुकतेच प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स वेलकम पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांशी व महाविद्यालयाची ओळख व्हावी व खेळीमेळीच्या वातावरणात शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करावा यासाठी या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, अ‍ॅड.केतन ढाके, अध्यक्ष बार असोसिएशन जळगाव, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश गाडगे हे उपस्थीत होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमात सहभाग घेऊन आपापल्या कलेचे प्रदर्शन केले. नवीन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे हलकेफुलके, बौद्धिक स्पर्धात्मक व टास्क देऊन महाविद्यालयातील प्रत्येक कोर्ससाठी मिस्टर फ्रेशर व मिस फ्रेशर यांची निवड करण्यात आली. बी. एल एल. बी. प्रथम वर्ष यावर्गातून योगेश न्हावी- मिस्टर फ्रेशर्स व मिस फ्रेशर म्हणून गायत्री पवार यांची तर एलएल. बी. प्रथम वर्ष या वर्गातून शुभम केंद्रे व किरण शिंदे हे मिस्टर फ्रेशर्स व मिस फ्रेशर म्हणून निवड झाली. एलएल. एमच्या वर्गातून सुयश ठाकूर व सुकन्या महाले यांचे मिस्टर व मिस फ्रेशर्स म्हणून निवड झाली.

 

या निवड प्रक्रियेत जजच्या निर्णयाक भूमिकेत अ‍ॅड.नागला शैलेश, मनीषा इंगळे व विद्यार्थी प्रतिनिधी आरिफ पिंजारी होते. शिक्षक कॉर्डिनेटर म्हणून शैलेश नागला व मनीषा इंगळे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून महेश जोशी, आरिफ पिंजारी, प्रियंका बाणाइतकर, किरण वानखेडे, चेतन गुजर, भूषण गवळी, सम्राट सोनवणे, मयूर सोनवणे, वैष्णवी गायकवाड, उत्कर्ष जैन, केतकी सावंत, मोहिनी नायसे, देवेंद्र झांबरे, सतीश राठोड, शुभांगी माळी, परदेसी दीपक यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थिती दर्शवली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like