ग्रामपंचायत ग्रामनिधीतुन अपंग बांधवांना धनादेशाद्वारे वाटप

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ८ मार्च २०२२ | जळगाव येथील रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे ग्रामपंचायत ग्रामनिधीतुन अपंग बांधवांना मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच ग्रामनिधीतला ५% वैयक्तिक लाभ योजनेच्या माध्यमातून गोर गरीब आणि गरजू, अपंग बांधवांना प्रत्येकी १ हजार प्रमाणे ७३ लाभार्थ्यांना धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले.

वाघोदा येथील ग्रामपंचायत ग्रामनिधीतुन काही अपंग लाभार्थ्यांनी आपल्या घरपट्टी, पाणीपट्टी मिळकत कर थकबाकीत भरणाकरुन लाभ घेतला आहे. ज्या लाभार्थ्यांकडे घर नाही त्यांना धनादेशाचे चेक देण्यात आले. यावेळी सरपंच मुबारक अलिखा तडवी, ग्रामविकास अधिकारी गणेश सुरवाडकर, उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी, सदस्य नितीन किसन सुपे, संजय काशिनाथ माळी, भुषण बाळू चौधरी, उदय प्रभाकर पाटील, हाजराबी करीम पिंजारी, प्रमिलाबाई युवराज भालेराव वाटप करण्यासाठी उपस्थित होते.

अमिनाबाई सुभान तडवी, हर्षा विशाल पाटील, मिनाक्षी हर्षल पाटील, साधनाबाई निळकंठ महाजन, भाग्यश्री बाळू वाघ, संगिता स्वप्निल पवार, सुमनबाई शंकर कापसे, क्लार्क प्रकाश वायके, पंकज मालखेडे, सुनिल पाटील, राहुल महाजन, अजय कराड, भुषण नेहते आदी कर्मचाऱ्यांसह गावातील अपंग लाभार्थी महिला, पुरुष मुले, मुली उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like