दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने ४ तोळ्यांचे दागिने लंपास
खान्देश लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने ४ तोळ्यांचे दागिने लांबवल्याची घटना तालुक्यातील आखतवाडे गावी घडली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २२ डिसेंबर रोजी रोजी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान अखतावाडे गांवी भरत वना पाटील यांच्या घरी ४० ते ४५ वयोगटातील दोन अनोळखी व्यक्ती आलेत. त्यांनी भरत पाटील आणि त्यांच्या पत्नीला आमच्याकडे सोने व चांदीचे दागिने पॉलीश करण्याची पावडर आहे. त्या पावडरने सोने व चांदीचे दागिने चांगल्या प्रकारे पॉलीश होत असतात, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत भरत पाटील यांच्या पत्नीने त्यांच्या हातातील हातातील १ लाख ६० हजार रुपये किमंतीच्या ४ तोळे वजानाच्या सोन्याच्या बांगड्या दोघं भामट्यांच्या ताब्यात दिले. या नंतर त्यांनी सोन्याच्या बांगड्या हया पॉलीश करुन देतो असे सांगून हातचालाकी करुन सदरच्या बांगड्या मोटार सायकलवरून पळ काढत लंपास केल्यात. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात दोघं अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. प्रशांत वाडीले हे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम