सात लाखांची रोकड दोन महिलांनी लांबविली

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I शहरातील नेताजी चौकातील कामगार भवन समोरील घरातून दोन अज्ञात महिलांनी भरदिवसा सुमारे सात लाखांची रोकड लांबवल्याची घटना दि. २२ रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

कामगार भवन समोर राहणाऱ्या सुशीलाबाई अमृत जोशी (७३) या घरात एकट्याच राहतात. गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजता त्या घराच्या मागील दरवाजाला कुलूप लावून घाटरोड परिसरात मसाला घेण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी बारा वाजेच्या सुमारास घरी परतल्यावर शेजारी राहणारी भक्ती गवळी या मुलीने सांगितले की, आजी तुम्ही बाहेर गेल्यावर साडेअकरा वाजेच्या सुमारास अंदाजे २५ ते २७ वयाच्या दोन महिला तोंडाला रुमाल बांधून घराजवळ आल्या होत्या. त्यापैकी एक महिला बाहेर थांबली तर एक महिलेला घरात जातांना बघितल्याचे सांगितले.

यानंतर सुशीलाबाई यांनी घरात जाऊन बघितले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी बेडमध्ये ठेवलेले सात लाख रुपये जागेवर नव्हते. विशेष म्हणजे घरातून जाताना अज्ञात महिलांनी आतून बंद असलेला मुख्य दरवाजा उघडला होता. दोन्ही महिलांना परिसरातील रहिवाशांना जाताना व येताना पाहिले आहे.सुशिलाबाई यांची मुलगी सुनिता नीलेश गोसावी (रा. मालेगाव) यांच्या घराच्या बांधकामासाठी, त्यांची दुसरी मुलगी प्रतिमा राजु बुवा (रा.धुळे) यांच्याकडून त्यांनी सात लाख रूपये आणलेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक के.के. पाटील आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

याबाबत शहर पोलिसात सायंकाळी दोन अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक पाटील या परिसरातील सर्व सीसीटीव्हीची तपासणी केली.

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like