ठाणे अंमलदाराला शिवीगाळ व दमदाटी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ I सीआरपीसी १०७ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचा राग आल्यामुळे एकाने जळगाव शहरातील पोलीस ठाण्यात येवून ठाणे अंमलदाराला शिवीगाळ करत दमदाटी केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या प्रकरणी बुधवार २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहर पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल संजय श्रीधर झाल्टे यांनी विलास हेमलाल सोनवणे (रा. वाल्मिक नगर, जळगाव) याच्याविरुद्ध सीआरपीसी १०७ प्रमाणे कारवाई केलेली होती. त्याचा राग आल्याने विलास सोनवणे याने बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता शहर पोलिस ठाण्यात येवून पोलीस हेड कॉन्स्टेबल झाल्टे यांना उद्देशून तुला जास्त झालेले आहे. यापुर्वी मी तुझ्यावर केलेले खोटे अर्ज व तुझ्याकडे तपासावर असलेल्या अदखलपात्र फिर्यादीत तुला त्रास व्हावा याकरीता माहीती अधिकार मागितले होते. तरी तुझी जिरलेली नाही. आता मी पुन्हा तुझ्यावरती वरिष्ठांकडे अर्ज व तक्रारी करेल. तू नोकरी कशी करतो?, तुला नोकरी करु देणार नाही आणि तुझी नोकरी कशी खातो तू पहाच, असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली. त्यानुसार याप्रकरणी संजय झाल्टे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार उल्हास चऱ्हाटे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like