पाचोऱ्यात धूम स्टाईलने सोनसाखळी लांबविली

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I शहरातील कृष्णराव हाऊसिंगमधील टेलरच्या समोरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखांची सोन्याची पोत आणि पेंडल अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईल लांबवल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात अधिक असे की, दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कमलाबाई जेठानंद वरलानी (वय ६६, रा. सिंधी कॉलनी) ह्या शहरातील कृष्णराव हाऊसिंगमधील टेलरच्या समोरून जात होत्या. याचवेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनी सोन्याची चैन आणि ७ ग्रॅम वजन असलेले सोन्याचे पेंडल ओढून पळ काढला. यात कमलाबाई यांच्या गळ्याला दुखापत झाली.या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परि.पो.उप.निरी.योगेश गणगे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like