जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । १ जानेवारी २०२३ ।जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणाने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मनोहर कैलास गायकवाड (वय-१९) रा. तांबापुरा, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, मनोहर गायकवाड हा आई-वडील आणि लहान भावासोबत तांबापूरा परिसरात वास्तव्याला होता. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. शनिवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता जेवण करून घराच्या मागच्या खोलीत जेवन करून झोपला. दरम्यान, मध्यरात्री त्यांने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी १ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता आई राधाबाई ह्या उठल्यानंतर प्रकार उघडकीला आला. मुलाचा मृतदेह पाहून तिने हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील, तुषार गिरासे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like