आयशरच्या धडकेत एक जण जागीच ठार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । १ जानेवारी २०२३ ।भरधाव आयशरच्या जोरदार धडकेत तालुक्यातील बिलाखेड येथील तरूण जागीच ठार झाल्याची थरारक घटना आज दुपारीचाळीसगाव शहरातील मोठ्या पुलावर घडली आहे.

तालुक्यातील बिलाखेड येथील विश्वनाथ विजय वाघ (वय-३२) हा आपल्या स्कुटीने जात असताना अचानक आयशरने (क्र. एम.एच.१८ बीजी १७९२) जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भिषण अपघातात विश्वनाथ विजय वाघ या तरूण चाकाखाली दाबला गेला. आणि जागीच त्याचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी ‌घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व मृतदेहाला ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. सदर धक्कादायक घटना आज दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा भिषण अपघात घडल्याने चाळीसगाव तालुका हादरले आहे. तत्पूर्वी घटना घडताच आयशर वरील चालक पसार झाला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like