शिव प्रेरणा ` द्वारे नागरिकांना मिळेल आध्यात्मिक ऊर्जा – मीनाक्षी दीदी

बातमी शेअर करा

ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या नवीन उपसेवाकेंद्राचे उद्घाटन

खान्देश लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । मानसिक स्वास्थासाठी ध्यानाभ्यासाचे महत्व लक्षांत घेता ब्रह्माकुमारीज चे नवनिर्मित शिवप्रेरणा उपसेवाकेंद्रा द्वारे परिसरातील नागरिकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळेल असे प्रतिपादन
राजयोगीनी ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदी यांनी रोटवद धरणगाव येथील ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या नवीन उपसेवाकेंद्राचे उद्घाटन प्रसंगी केले.

याप्रसंगी त्या म्हणाल्या की, आनंदी जीवन जगण्यासाठी योग, ध्यान, मेडिटेशन आदी आवश्यक असते यासाठी ब्रह्माकुमार विजय पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी परिसरात चांगले प्रबोधन केले आहे. नवनिर्मित भवन द्वारे हे कार्य अधिकप्रभावी पद्धतीने होईल असा आशावाद ही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे नवीन वर्षात नवीन इमारत `शिव प्रेरणा`चे उद्घाटन परमआदरणीय राजयोगिनी ब्रम्हाकुमारी मिनाक्षी दिदिजी उपक्षेत्रीय निर्देशिका जळगाव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी जि.प. सदस्य प्रताप पाटील, ब्रह्माकुमारी  नितादीदी धरणगाव, ब्र. कु.मिरा दीदी, पाचोरा, ब्र.कु.पुष्पा दीदी भडगांव, सुनिता पाटील सरपंच, माऊंट अबू येथील ब्र.कु.जगदीश भाई, ब्र.कु.हरीश भाई आदी उपस्थित होते.

या कार्यासाठी सुमन माताजी यांनी भूमी दान दिली त्या दातृत्वाचा सन्मान सन्मान या प्रसंगी   करण्यात आला.

विद्यालयाचा परिचय ब्र.कु. कल्याणी दीदी यांनी दिला, सूत्रसंचालन ब्र.कु.तेजल दीदी यांनी केले

कार्यक्रमाच्या सुरवातीला मिनाक्षी दिदिजी त्यांचे ढोल-ताशाच्या गजरात सन्मान यात्रा काढून नवीन वास्तू च्या ठिकाणी त्यांचे आगमन झाले याठिकाणी शिव परमपिता परमात्मा यांचे आवाहन करून नविन इमारतीचे उद्घाटन समारोह करण्यात आले

यावेळी जिल्ह्यातील ब्रम्हाकुमरिज परिवाराचे तीन हजार च्या संख्येने आलेले साधकाची उपस्थिती होती

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like