आमदार चंद्रकांत पाटीलांनी स्वखर्चातून दिव्यांग बांधवाला केली सायकल वाटप
खान्देश लाईव्ह | १० मार्च २०२२ | जळगावात रावेर तालुक्यातील खिर्डी येथे दिव्यांग बांधवाला शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वखर्चातून सायकल वाटप करण्यात आली.
मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्वखर्चातून खिर्डी येथील अपंग एकनाथ नारायण न्हावी यांना जेष्ठ शिवसैनिक धोटू पाटील यांच्या हस्ते अपंग सायकल देण्यात आली. अपंग नागरिकाचे पायी चालत जाणे शक्य नसल्याने त्यांचे हाल होऊ नये, यासाठी आमदार पाटील यांच्याकडून अपंग सायकल देण्यात आल्याने अपंग व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
यावेळी खिर्डी खुर्द सरपंच राहुल फालक, अलताब बेग, निळकंठ बढे, जाकीर पिंजारी, घनश्याम पाटील, प्रल्हाद कोचुरे, चंद्रकांत बढे, नितीन खाचने आदी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम