अल्पवयीन मुलीवर अत्याचार, घरी सांगितल्यास वडिलांना जीवे मारण्याची धमकी
खान्देश लाईव्ह | १० मार्च २०२२ | जळगावातून शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि वडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्धच्या एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसेंदिवस अत्याचाराचे अनेक प्रकार समोर येत आहेत परंतु याला कुठेही आळा बसलेला नाही.
जळगाव शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी हीची दीपक सोनवणे या मुलाशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्या मुलीला भेटण्यासाठी शहरातील फुले मार्केटमध्ये बोलावले. भेटघेण्यासाठी आल्यावर तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याचा करून धमकी दिली.
दरम्यान ही घटना घरी कोणालाही सांगितल्यास तुझ्या आईवडिलांना मारून टाकेल अशी तरूणाने धमकी दिली.
तसेच अल्पवयीन मुलीच्या काकाच्या राहत्या घरी देखील तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. आणि “तू जर मला भेटण्यासाठी आले नाही तर मी तुझे फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या वडिलांना मारून टाकेल” अशी देखील धमकी दिली.या संदर्भात पीडित अल्पवयीन मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दीपक सोनवणे याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम