राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावर, गिरीश महाजनयांचा इशारा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १० मार्च २०२२ | पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी एक सूचक वक्तव्य केले. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. भाजपनं पहिल्या दोन तासांच्या कलांमध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे.

भाजपला 222 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षाची आघाडीही निवडणुकांमध्ये ‘काँटे की टक्कर’ देत आहेत. याच ‘काँटे की टक्कर’वर राज्यातील भाजपचे नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत.
,’उत्तर प्रदेश ‘झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ म्हणले आहेत. तसेच ठाकरे सरकारला इशारादेखील त्यांनी यावेळी दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी सर्व एग्झिट पोल फेल ठरतील असेही म्हटले आहे.

उत्तर प्रदेशसह, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने मजल मारली, दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like