वरखेडी येथील माधुरीने राज्यातुन पटकावला १० व्या क्रमांक
खान्देश लाईव्ह | २५ मार्च २०२२ | जळगावात पाचोरा तालुक्यातील वरखेडी माधुरी चौधरी हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. राज्यातुन १० व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान तीने पटकावला आहे.
जळगाव येथील अशोक पुंडलिक चौधरी यांची कन्या माधुरी हिचे बालपणीचे शिक्षण हे वरखेडी गावात झाले. असुन तिने उच्च शिक्षण हे जळगांव येथील एस. एस. मणियार लाॅ विद्यालयात घेऊन एल. एल. एस. पदवी प्राप्त केली. पुढील शिक्षणासाठी तद्नंतर माधुरी चौधरी हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेत सहभाग घेतला.
माधुरी चौधरीने राज्यातुन १० व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान तीने पटकावला. तिला वरखेडी येथील योगेश जाधव, गणेश शिरसाठ सह मित्र परिवाराचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. माधुरी चौधरी हिचे परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम