भुसावळात एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशाचा मोबाइल चोराला अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ मार्च २०२२ | चोरट्याचा सुळसुळाट सगळीकडे दिसतो तर प्रवासात असताना देखील आजूबाजूला चोरटे वावरत असतात. असाच एक प्रकार जळगावत घडला आहे.डाऊन सेवाग्राम एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाचा मोबाइल चोरट्यांला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. मयूर उर्फ भैय्या संजू अंभोरे (वय २२) असे त्याचे नाव आहे.

समशेर अली मलिक वय ६०, रा.मुंब्रा,येथील रहिवासी. हे पत्नीसह १५ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई-नागपूर सेवा-ग्राम एक्स्प्रेसच्या एस-४ बोगीतून ठाणे ते अकोला असा प्रवास करत होते. प्रवासत भुसावळ स्थानक येण्यापूर्वी मयूर अंभोरे याने फिर्यादीच्या बर्थ जवळ येऊन कोणते स्थानक आले? अशी विचारणा केली.

मलिक यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या पत्नीच्या हातातील ११ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून पळ काढला.तातडीने मलिक यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात मयूर अंभोरेचा सहभाग असल्याचे धागेदोरे मिळताच अटक झाली.लोहमार्ग येथील पोलिसांनी मयूर अंभोरेचा अटक केली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like