भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संतोष सोनवणेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
खान्देश लाईव्ह | २५ मार्च २०२२ | जळगाव बोदवड येथील माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संतोष सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वात मनुर बु. प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था संचालक मंडळाची निवडणूक सन 2021-22 ते 2026-27 साठी २४ मार्च रोजी बिनविरोध पार पडली.
या निवडणुकीत ओंकार सोनवणे, अनिल देवकर, सुधाकर चावरे, देविदास पाटील, जानकिराम शेळके, संतोष वाघ, संजय बावस्कर, जगन्नाथ पाटील, नर्मदाबाई ढोले, अन्नपूर्णा पाटील, संतोष सोनोने, निवृत्ती घुले, भिका वाघ, आत्माराम खेलवाडे, विलासराव देशमुख, जितेंद्र पाटील यांची तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक भरत आप्पा पाटील, शिवाजीराव ढोले, नामदेव भाऊ पाटील यांच्यासह गावातील प्रमुख जेष्ठ मंडळी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम