नशिराबाद गावात लग्न जुळत नसल्या कारणाने तरुणाने केली आत्महत्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ मार्च २०२२ | जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या कारणाने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल. तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चेतनच्या मृत्यूबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चेतन खरोटे वय 30 असं या तरुणाचं नाव चेतन हा कुटुंबियांसह नशिराबाद येथे वास्तव्यास आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी चेतन खरोटे हा त्याच्या आईला वारंवार लग्न होत नसल्याने तीन दिवसांपासून व्यसनाच्या ही जास्त आहारी गेला. यामुळे चेतनची आई देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपल्या नातेवाईकांकडे निघून गेली होती. ही संधी साधत चेतनने घर आतून बंद केले आणि घराच्या छतावरील कडी-कोयंड्याला दोरी बांधून गळफास घेतला.

शेजाऱ्यांना संशय आला बराच वेळ झाला तरी घरातून कुणी बाहेर येत नसल्यामुळे त्यांच्या आईला माहिती दिली. तेव्हा घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता चेतनने आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चेतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याबाबत नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like