हल्ला करण्यासाठी बिबट्याने गाठली वस्ती, तरुणांच्या आरडाओरडीने बिबट्याने ठोकली धूम

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ मार्च २०२२ | जंगलाशिवाय शेती शिवारात शिकारीच्या शोदार्थ भटकणारा बिबट्या थेट मानवी वस्तीपर्यंत येऊन पोहचल्याने दहशत निर्माण झाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा येथे रात्री उशिरा गोठ्यात बांधलेल्या गुरांवर बिबट्याचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतू दोन तरुणांनी वेळीच हाणुन पाडल्याची घटना २४ मार्च रोजी मध्यरात्री घडली.

जळगाव तालुक्यातील कुऱ्हा-वडोदा रस्त्यावर असलेल्या चिंचखेडा येथे सह-सातशे लोकांच्या वस्तीसह गुरांच्या गोठ्याजवळील हल्याच्या शोधात बिबट्या आढळून आला.
रात्री दोनच्या सुमारास कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्यामुळे गच्चीवर झोपलेला तरुण अनंता गजानन पाटील हा जागा झाला. समोर नाल्याच्या काठावर एक बिबट्या समोर गुरांवर नजर ठेवून असल्याचे त्याच्या निर्दशनास आले त्याने त्याचा मित्राला उठविले. तरुणांनी सावधगिरी बाळगली हालचाल पाहून बिबट्या पळाला.

या दोघं तरुणांनी आरडाओरडा केला तसेच कुत्र्यांच्या आवाजाने बिबट्याने धुम ठोकली. वेळीच जाग आल्याने गोठ्यातील पाळीव प्राणी वाचले. मात्र या घटनेमुळे तेथील ग्रामस्थ व पशुपालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले.बंदोबस्त करण्याची मागणी पुढे येत आहे. याबाबत वनाधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. वनविभाग काय भुमिका घेतो याकडे लक्ष लागुन आहे. वनविभागाच्या भुमिकेबाबत कळु शकले नाही.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like