रिक्षातून तोल खाली गेल्याने अकरावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
खान्देश लाईव्ह | २५ मार्च २०२२ | बस सेवा बंद असल्याने विद्यार्थिनी रिक्षातून प्रवास करतात. विद्यार्थ्यांची प्रवासाची आबळ होत आहे. तर जळगावत रिक्षातून तोल गेल्याने खाली पडून अकरावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बोदवड तालुक्यातील शेलवड येथील अकरावी मध्ये शिक्षण घेणारी तृप्ती भगवान चौधरी ही विद्यार्थिनी बस संप सुरू असल्याने रिक्षातून घरी जात होती. दरम्यान रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसलेले असताना रिक्षातून पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी होऊन झाली असता तीला बोदवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात येत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
यादरम्यान तोल गेल्याने ती रिक्षातून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. मागील अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. बस सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी यावे लागते. आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. १० विद्यार्थी परिक्षाकरता मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात . आता परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम