नशिराबाद येथून दुचाकी चोरी
खान्देश लाईव्ह |१ नोव्हेंबर २०२२ | हॉटेल कारभारी येथून हॉटेलचालकाची २० हजार रुपये किमतीची मोटरसायकल आज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल दिलीप पोतदार (वय-32, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याचे नशिराबाद येथे हॉटेल कारभारी म्हणून हॉटेल असून हॉटेल चालवून आपला उदरनिर्वाह करतो. नेहमीप्रमाणे ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता राहुल हा त्याची दुचाकी (एमएच १९ सीके २७७२) ने कामावर आला. त्या ठिकाणी दुचाकी पार्क करून कामावर निघून गेला. दरम्यान अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रात्री २.३० वाजता समोर आला. राहुलने त्याच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्याला दुचाकी मिळून आली नाही. अखेर सोमवार ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता नशीराबाद पोलीस ठाण्यात धाव ठेवून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून अज्ञात चळवट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार आलिया खान करीत आहे..
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम