जळगावात एकाची दुचाकी लंपास
खान्देश लाईव्ह |१ नोव्हेंबर २०२२ | शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरून एकाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भागचंद जयसिंग परदेशी (वय-३२) रा. हनुमान मंदिर, पारस मेडिकल समोर, आयोध्या नगर जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांचा वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. नोकरीसाठी त्याच्याकडे दुचाकी (एमएच १९ डीई ४९६६) आहे. सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तो कामाच्या निमित्ताने दुचाकीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आला. त्या ठिकाणी दुचाकी पार्किंग करून कामानिमित्त निघून गेला. दरम्यान अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले.याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपास पोलीस नाईक रुस्तम तडवी करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम