गुढीपाडव्या निमित्त नर्तनरूपी गुणसंकीर्तन
खान्देश लाईव्ह | २२ मार्च २०२२ | स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित व जोशी बंधू ज्वेलर्स प्रायोजित गीत रामायणा वर आधारीत नर्तन-कीर्तनाचा सुरेल संगम असलेली एक अंकी नृत्य नाटिका आयोजित करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम शनिवार दि. २ एप्रिल २०२२ रोजी गुढी पाडव्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात पार पडणार आहे.
छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला डॉ. भवरलाल व कांताबाई फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे. साडे तीन मुहूर्ता पैकी एक पुर्ण मुहूर्तावर हा कार्यक्रम होणार आहे.आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो अश्या कै. ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या अजरामर रचनांना बाबूजी अर्थात कै. सुधिर फडके यांनी संगीत देऊन गीत रामायण घराघरात पोहोचविले, आणि हेच दिव्य गीत रामायण हाच या नृत्य नाटिकेचा मुळ गाभा आहे. किर्तन परंपरेतील आदिगुरू देवर्षी श्री. नारद मुनी आणि नर्तन परंपरेचे आद्यप्रवर्तक आदिगुरू श्री. भरत मुनी या दोन्ही भारतीय कला परंपरांचा संगम या नृत्य नाटिकेत झाला आहे.
संत श्री. एकनाथ महाराजांचे श्री भावार्थरामायण संत श्री. तुलसीदास यांचे श्री रामचरितमानस सद्गुरू श्री. अनिरुद्ध बापूंचे श्री रामरसायन या सर्व दिव्य ग्रंथांचे मार्गदर्शन या रचनेस लाभले आहे. पद्मभूषण गुरु डॉक्टर पद्मा सुब्रमण्यम यांनी पुनरुज्जीवित केलेली भरत नृत्यम् ही नाट्य शास्त्रावर आधारित मार्गी नृत्यशैली हे याचे वैशिष्ट्य आहे. गीतरामायणा याशिवाय या नृत्यनाटिकेत किर्तन आख्यानातील पदे, आर्या, दिंडी इ. तर सादर होतेच पण प्रत्येक रचने पूर्वी निरुपण सादर होते. किर्तन परंपरेतील आदिगुरू देवर्षी श्री. नारद मुनी आणि नर्तन परंपरेचे आद्यप्रवर्तक आदिगुरू श्री. भरत मुनी या दोन्ही भारतीय कला परंपरांचा संगम या नृत्य नाटिकेत झाला आहे. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाने केले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम