महाविद्यालयाच्या अध्यापकांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना मागण्यांकरिता निवेदन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २२ मार्च २०२२ | जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यापकांनी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग खात्याचे मंत्री अमित देशमुख यांना रविवारी जळगाव दौऱ्या पार पडला आहे.वैद्यकीय अध्यापकांच्या मागण्या आपण लवकर पूर्ण करू असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिले आहे.

विविध प्रकारचे भत्ते सातव्या वेतन आयोगाच्या प्रमाणे मिळाले पाहिजे, करार पद्धतीने नियुक्त्याचा निर्णय रद्द करावा. सातव्या वेतन आयोगात मिळणारी करिअर ऍडव्हान्समेंट योजना सातव्या वेतन आयोगात लागू केली पाहिजे,या करिता महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आले.

अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे शासकीय सेवेत समावेशन केले पाहिजे, सातव्या वेतन आयोगात पदव्यूत्तर पदवी अर्हताधारकाला प्रोत्साहनपर सहा वेतनवाढी लागू केल्या पाहिजे, करार पद्धतीवरील नियुक्तीबाबत ९ फेब्रुवारी २०२२ चा शासन निर्णय रद्द केला पाहिजे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठीच्या अध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द केल्या पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रोत्साहन भत्याची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी केली पाहिजे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अध्यापकांना प्राधान्य दिले पाहिजे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनतर्फे रविवारी जळगाव शाखेतर्फे वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री अमित देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनचे जळगावचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे, सचिव डॉ. योगिता बावस्कर, डॉ.किशोर इंगोले, डॉ.संदीप पटेल, डॉ. संगीता गावित, डॉ. इमरान तेली, डॉ. चेतन भंगाळे, डॉ.श्रीकृष्ण चव्हाण, डॉ. विलास मालकर, डॉ.गिरीश राणे आदि अध्यापक निवेदन देताना उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like