जळगावात फार्मसी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाच दिवसीय शिबिरात राबवले उपक्रम

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २२ मार्च २०२२ | जळगाव येथील श्री गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात फार्मसी विद्यार्थ्यांनी पाथरी येथे पाच दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात श्रमदान केले.

गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिबिरात पंचवीस विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या शिबिरासाठी महाविद्यालयाचे संस्थापक तथा जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, विशाल देवकर यांनी विशेष सहकार्य केले.

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत झालेल्या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी पाथरी गावात ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण असे अनेक उपक्रम राबवले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्मशानभूमी, ग्रामपंचायत आणि गावातील मुख्य परिसरात विविध प्रकारच्या पर्यावरण पूरक अशा पन्नास वृक्षांची लागवड केली. गावात व्यसनमुक्ती व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसमोर पथनाट्य सादर केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेश पवार, अतुल पाटील, जयेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like