आजचे राशीभविष्य, बुधवार 06 जुलै 2022
खान्देश लाईव्ह | 06 जुलै 2022 |
कर्क:-
आजचं राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्ती आपल्या इच्छेला अधिक महत्त्व देतील.
मेष:-
कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. परक्या व्यक्तींपासून दूर राहावे. या आधीचा कामातील अनुभव उपयोगी पडेल.
वृषभ:-
आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. स्वत:च्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. दिवस मजेत जाईल. गोडीगुलाबीने कार्य साधाल.
मिथुन:-
क्षणिक मोहात पडाल. स्वत:वर खर्च कराल. आर्थिक उलाढाल चांगल्या प्रकारे होईल. मनात नसती शंका आणू नका.
कर्क:-
कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल. चैन करण्याकडे अधिक कल राहील. व्यवसायातून चांगली कमाई होईल. पुढील गरजांसाठी आत्ताच खर्च कराल.
सिंह:-
तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. दिवस आनंदात जाईल. नवीन विचार जोपासले जातील.
कन्या:-
ग्रह बदलाचा चांगला परिणाम दिसून येईल. आपल्या समोरील व्यावसायिक संधी ओळखा. त्यातून तुमची सकारात्मकता वाढेल. पत्नीशी वाद वाढवू नका.
तूळ:-
कमी श्रमातून कामे साध्य करता येतील. रेस, जुगार यातून कमाई कराल. जुनी देणी भागवता येतील. योग्य गुंतवणूक करू शकाल.
वृश्चिक:-
प्रेमाचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांशी परिचय वाढवता येईल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल.
धनू:-
हाताखालील लोकांकडून कामे सुरळीत पार पडतील. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील.
मकर:-
उगाचच येणारा आळस टाळावा लागेल. ऐनवेळी होणारी गडबड टाळावी. कामाचा योग्य आराखडा तयार ठेवावा.
कुंभ:-
दिवस आपल्या स्वत:च्या इच्छेनुसार घालवाल. नवीन ओळखी करून घ्याव्यात. भडक शब्द वापरणे टाळा.
मीन:-
जुने मित्र गोळा कराल. कामासाठी काही वेगळे पर्याय शोधावेत. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम