आजचे राशिभविष्य, कसा आहे आजचा दिवस
खान्देश लाईव्ह | २९ मार्च २०२२ | मेष : काहींची वैचारिक प्रगती होईल.अनेकांचे सहकार्य लाभेल.आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक समारंभ होतील. दिवस शुभ.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जीवनात भाग घ्याल. उत्तम दिवस.
मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.उच्च प्रतीचे अध्यात्मिक, सामाजिक अनुभव येतील.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.अष्टम चंद्र आणि गुरू काही अध्यात्मिक अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल.
सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.आज सप्तम चंद्र गुरू खूप काम मिळवून देईल. आर्थिक लाभ झाल्यामुळे आनंदी राहाल.
कन्या : मनोरंजनाकडे कल राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
तुळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.आज पंचम चंद्र उत्तम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. संतती आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल.
वृश्चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.आज घरात आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृती संबंधी उत्तम फळ देईल.
धनु : विरोधकांवर मात कराल. काही कामे धाडसाने पार पाडाल.आज जीवनातील एक चांगला दिवस आहे कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल.
मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. शनि मंगळ राशीत काही प्रकृतीचे त्रास, निर्माण करतील. कुटुंबाकडे लक्ष द्या.
कुंभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. सौख्य व समाधान लाभेल.गुरू चंद्र योग आज आनंदात दिवस घालवा असे सुचवत आहे.
मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. आज चंद्र गुरू आर्थिक दृष्ट्या घडामोडी घडवेल. घरामध्ये काही आनंदी घटना घडतील.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम