बेदम मारहाण कैद्याचा मृत्यू, तुरूंग अधीक्षकांसह ,तुरूंग रक्षकांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २९ मार्च २०२२ | जळगावात मुक्ताईनगर तालुक्यातील आरोपीला भुसावळ दुय्यम कारागृहात आणल्यानंतर तुरूंग अधीक्षकांसह तुरूंग रक्षकांनी बेदम मारहाण केली होती. 1 ते 4 मार्च 2020 दरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी या कैद्याचा मृत्यू झाला तर दोन वर्षानंतर शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

चांगदेव येथील सुनील भागवत तारू (40, चांगदेव, ता. मुक्ताईनगर) यांना मुक्ताईनगर न्यायालयाच्या आदेशानुसार 29 फेब्रुवारी 2020 रोजी मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार सुनील तारू यांना भुसावळ दुय्यम कारागृहात यांची प्रकृती अस्वस्थ झाली. त्यांच्यावर वेळीच औषधोपचार करणे गरजेचे असताना कारागृहातील तुरूंग रक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केली. तसेच डोक्यावर व ढोपरावर कोणत्यातरी वस्तूने हल्ला चढवल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता.

4 मार्च 2020 रोजी त्यांना उपचारार्थ हलवल्यानंतर त्यांचा मृत्यू ओढवला होता. सुरुवातीला या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र शवविच्छेदन अहवालाच्या निष्कर्षानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन पडघण करीत आहेत.

यात मयताची पत्नी मंगला सुनील तारू यांनी भुसावळ शहर पोलिसात मंगळवारी दिलेल्या फिर्यादीनुसार तुरूंग अधीक्षक नागनाथ महादेव भानोसे, तुरूंग रक्षक व हवालदार सुभाष बाबूराव खरे, हवालदार भानुदास निवृत्ती पोटे, सीताराम विठ्ठल कदम, अनिल श्रीराम बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like