सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी, तर 0.45 टक्क्यांची वाढ
खान्देश लाईव्ह | ३० मार्च २०२२ | सध्याच्या काळात सोन्या चांदीते भाव सारखे बदलत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारही अडचणीत पडले आहेत. रशिया युक्रेन युद्ध, महागाई आणि अन्य घटकांचा सोन्या चांदीच्या दरावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांच्या जोरदार घसरणीनंतर बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी आली आहे.
आज जळगावात सोन्याचा भाव 0.45 टक्क्यांनी वाढून 51,518 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे, तर चांदीचा भाव 0.21 टक्क्यांनी वाढला आहे. यानंतर चांदीचा भाव 67,085 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील सराफा बाजारात अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली आहे आणि किंमती वाढल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत लागोपाठ चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. मंगळवारी रुपया 36 पैशांची मजूबती आणि डॉलरच्या तुलनेत 75.80 वर पोहचला आहे.
मुंबई ४७, ७५०
पुणे ४७,८१०
नाशिक ४७,६५०
नागपूर ४७,८१०
दिल्ली ४७,४५०
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम