पहा आजचे राशिभविष्य, कसा असेल तुमचा दिवस

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ मार्च २०२२ | मेष : शासकीय कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.प्रामाणिकपणा व नीतिमत्ता महत्त्वाची आहे.

वृषभ : व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रवास सुखकर होतील.

मिथुन : शत्रू पीडा कमी होईल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : काहींची वैचारिक प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता. मनाविरुद्ध घटना घडतील.

सिंह : मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे मनोबल कमी होईल.हितशत्रूंवर मात कराल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

कन्या : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर यश खेचून आणाल.

तूळ : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. आत्मविश्‍वास वाढेल.वस्तू हरवण्याची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहणे योग्य.

वृश्‍चिक : महत्त्वाचे निर्णय पार पडतील. काहींना प्रवासाचे योग येतील.मेजवानीचा लाभ होईल.अलंकार व वस्त्रांची मनपसंद खरेदी कराल.

धनू : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. कर्ज होण्याची शक्यता आहे.

मकर : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.आर्थिक प्रगती होईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल.

कुंभ : सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. मानसन्मान मिळवून देणारी घटना घडेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मीन : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. प्रवास शक्यतो टाळावेत.सरकारी कामे रखडतील.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like