सलग दोन दिवसानंतर आज पेट्रोल डिझेलचे दर स्थिर
खान्देश लाईव्ह | २४ मार्च २०२२ | रशिया आणि युक्रेनयांच्यातील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या आहेत. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतर आज गुरुवारी दिलासा मिळाला आहे. आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
युद्धाचे परिणाम हळूहळू जगातल्या सर्वच देशात दिसू लागले आहेत.भारतात गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशात सलग दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत होते. आज जळगावात पेट्रोलचा प्रति लिटरचा दर जवळपास ११२.९७ रुपये इतका आहे. तर डिझेलचा प्रति लिटरचा दर ९५.६९ रुपये इतका आहे.आता सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.
युक्रेन-रशियाचे संकट अधिक गडद झाल्यामुळे पुरवठा आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने त्यांच्यावर मोठा बोजा पडला आहे. त्याची भरपाई करण्यासाठी किरकोळ दरात वाढ करणे गरजेचे झाले आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८५ पैशांनी वाढ झाली. ते १११.६७ रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईत पेट्रोल ७५ पैशांनी वाढून १०२.९१ रुपये प्रतिलिटर झाले. कच्चे तेल १०० ते १२० डॉलर प्रति बॅरल राहिल्याने कंपन्यांना वाढ करणे गरजेचे .
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम